- राष्ट्रवादीची जागा वाटपाची भूमिका अमान्य करत सन्मानाची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडी जागावाटपा मध्ये काँग्रेस पक्षाला पिपंरी चिंचवड शहरातील एक मतदारसंघ मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आक्रोश मेळाव्याचे आयोजन केले.
पिंपरीतील एका हाॅटेलात आयोजित केलेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यानी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी आजवरच्या राष्ट्रवादी च्या अनुभवावर टीका करत कार्यकर्त्यांनी मनसोक्त भावना व्यक्त केल्या.
सन्मानाचे जागावाटप होणार नसेल तर आघाडीच नको असा पवित्रा मेळाव्यात घेण्यात आला. राष्ट्रवादीच्या जरी मित्र पक्ष असेल तरी त्याची कार्यपध्दती हि मितरत्वाची वाटणार नाही असेच अनुभव आजवर असल्याचे बहुतांश जणांना सांगितले, या बैठकीस कोणीही मोठा नेता उपस्थित नसताना हि कार्यकर्त्यांचा उत्साह व प्रतिक्रिया ठाम व स्पष्ट असल्याचे दिसून आले. सर्वसामान्य कार्यकर्ताच आता सुत्रे हातात घेऊन कोणत्याही नेत्याविना आपली मागणी राज्य नेतृत्वाकडे मांडणार असल्याचे चित्र सुस्पष्ट झाले.
या प्रसंगी उमेश बनसोडे,किशोर जगताप, युनुस बागवान,निखिल भोईर, सौरभ शिंदे, विरेंद्र गायकवाड, विजय ओव्हाळ, अशोक काळभोर, नरेंद्र बनसोडे व मनोज कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “जागावाटपाची चर्चा सुरू असतानातिन्ही जागा राष्ट्रवादीच लढविणार असे अजितदादांनी जाहीर केले व कार्यकर्त्यांच्या मनांत असंतोष निर्माण झाला कारण काँग्रेस चे चिन्ह या निवडणूकीतून गायब झाले तर आपण बघ्याची भूमिका घ्यायची का ? असा प्रश्न उभा झाला आहे,कार्यकर्त्यांची संतप्त भूमिका हि साधारण साहजिक आहे कारण आजवरचे अनुभव तसेच सांगतात, चंदूकाका जगताप, भाऊसाहेब भोईर, हर्षवर्धन पाटील, सुजय विखे, नाना पटोले, गुजरात निवडणूका हि काही उदाहरणे आहेतच. चांगले नेते पक्ष सोडून कसे जातील व पक्ष दूबळा कसा होईल अशी भूमिका आजवर त्यांची दिसून आली आहे जर वारंवार अशी गळचेपी होत असेल तर आता काँग्रेस चा सामान्य कार्यकर्ता हे सहन करणार नाही, आघाडी योग्य असावी त्यात तुम्हाला आघाडी व आम्हाला पिछाडी असे असेल तर आता बिघाडी झालीच समजा कारण तुम्ही ही पुढे गेले पाहीजे व सोबत आम्ही ही पुढे गेले पाहीजे कारण आज ती काळाची व जनहिताची गरज आहे म्हणून शहरातील एक मतदारसंघ सोडून योग्य भूमिका राष्ट्रवादीने घ्यावी”
मनोज कांबळे म्हणाले,” ही बैठक कार्यकर्त्यांची आहे यात काँग्रेस ने आजवर आघाडी कशी पाळली हे सर्वानी पाहिले आहे व राष्ट्रवादीने काय केले हे ही सर्वांना माहित आहे. औषधालाही काँग्रेस नको म्हणणारे आता कांगरेसरूपी औषध शोधू लागले आहेत,जर जागावाटप नीट झाले नाही तर राष्ट्रवादीला हा काँग्रेसचा कार्यकर्ता हि निवडणूक सोपी जाऊ देणार नाही, दादांनी लोकसभे च्या वेळी दिलेल्या शबदाप्रमाणे वागावे हि विनंती”
या प्रसंगी एन एस यू आय चे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे, माजी नगरसेवक अख्तार चौधरी, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यू आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश कंधारे, उमेश बनसोडे,सचिन कोंढरे,आबासाहेब खराडे,पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव,चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे,भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विरेंद्र गायकवाड,स्वप्निल बनसोडे,दिपक भंडारी, अनिल सोनकांबळे, रोहन गायकवाड,नियाज खान,फारूख खान, पांडूरंग वीर आदि पदाधिकारी व ईतर कार्यकर्ते सहभागी झाले.















