न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०१९) :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे ७० जणांवर इडीने गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शुक्रवारी (दि. २७) रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला पिंपरी चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, सांगवी, नेहरूनगर, भोसरी, संत तुकाराम नगर आदी भागात स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी परिसरात फिरून व्यापाऱ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. त्यास व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत होता. तर शहराच्या काही भागात बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचेही दिसून आले.

पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी कॅम्प परिसरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका निकिता कदम आणि हरीश कदम यांनी कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांना “मी साहेबांसोबत…”ची घोषणा देत फेरी काढून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याची विनंती केली. तसेच संत तुकारामनगर, वल्लभनगरमध्ये माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख यांनी मोर्चा काढला होता.

या बंदमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही हिरारीने सहभाग घेत डांगे चौक, वाकड व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला, यावेळी विशाल वाकडकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिं. चिं. शहर, विशाल काळभोर संघटक राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य, सतीश दरेकर माजी नगरसेवक, गोरक्षनाथ पाषाणकर माजी स्विकृत नगरसेवक, विशाल पवार, फरदीन सय्यद, चिंचवड विधानसभा सरचिटणीस, मयूर थोरवे, चिंचवड विधानसभा संघटक, अब्दुल शेख, भोसरी विधानसभा सरचिटणीस, धनजय जगताप, प्रतीक साळुंखे, निखिल दळवी आदी युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.