न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०१९) :- घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कुप्रसिद्ध गुन्हेगार राजेश तिवारी याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली.
याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शुक्रवारी (दि. २७) रोजी दिले. राजेश उर्फ मुन्ना रविशंकर तिवारी (वय २३, रा. मोरेवस्ती, चिखली) असे कारवाई केलेल्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश याने भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्टल, लोखंडी रॉड, तलवार, चाकू, कोयता यांसारख्या जीवघेणी हत्यारे बाळगली आहेत. त्याच्यावर मागील चार वर्षात दंगा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जाळपोळ असे गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत.












