न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्याने आता मलाही राजकारणात राहायचे नाही, असे सांगत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.
अजितदादा जर राजकारणात नसतील तर, मलाही राजकारणात कोणताही रस नाही, असे जावेद शेख यांचे म्हणणे आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे दिला असून, हा राजीनामा आयुक्त व महापौर यांच्याकडे सुपूर्त करावा. तसेच, पक्षाने गेली पंधरा वर्षे संधी दिल्याबद्दल मी पक्षनेतृत्वाचे आभार मानतो, असेही शेख यांनी म्हटले आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.












