न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- “शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसंच आता शेती आणि व्यवसाय करण्याचा सल्ला मुलांना दिल्याचे शरद पवार यांनी काल सांगितले.
यामध्ये मला कोणत्याही प्रकाराचे तथ्य वाटत नसून अजित पवार शांत बसणारी व्यक्ती नाही. त्यांना राज्यात मानणारा एक वर्ग असून ज्या प्रकारे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडून काही काळ कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्या प्रमाणे अजित पवार करीत आहे.
हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता. अजित पवार स्वतःचा पक्ष काढण्याची शक्यता आहे,” असे मत खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले. अजित पवार यांच्या आमदारकीच्या राजीनामा देण्यामागे अनेक कारणे समोर येत आहे. त्या प्रश्नावर संजय काकडे यांनी भूमिका मांडली.












