- भोसरी मतदारसंघात मराठवाडा-सोलापुर पॅटर्न चालणार; राजकीय वर्तुळात चर्चेला उत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- भोसरीमध्ये नेहमीच उपरे, पोट-भरायला आलेत, झोपडपट्टीवाले म्हणुन ज्यांची नेहमीच हेटाळणी केली जाते असा वर्ग म्हणजे मराठवाडयातील नागरीक. पण या भागातील देखील काही मंडळीने उदयोग व्यवसायात, नोकरी-चाकरीमध्ये देखील आघाडी घेतली आहे. पण ती संख्या बोटावर मोजण्याइतकीच. निसर्गाने पाठ फिरवली म्हणून औद्योगीक नगरीच्या आश्रयाला आलेले व आपल्याच राज्यतील मराठी बांधव असले तरी नेहमीच सापत्निक वागणुकीला त्यांना सामोरे जावे लागतेच. निवडणुका जवळ आल्याकी आपआपल्या जिल्हाचे प्रतनिधीत्व करणाऱ्या काही जिल्हा मित्र मंडळांच्या व्यक्तिकडून रहिवाशांना कोल्ह्याच्या आवताणाप्रमाणे बोलवून भुल-थापा व दिवा स्पप्न दाखवून कोण्या तरी स्थानिक राजकीय नेत्याच्या दावणीला संघठना बांधायची व आपला वैयक्तिक स्वार्थ साधून घ्यायचा हे ठरलेलेलच.
यामुळे शहरातील लाखो सामान्यवस्थेत जीवन जगत असलेल्या मराठवाड्यातील व सोलापुर मधील मतदारांना कधीच प्रगतिची दिशा सापडली नाही. आज पाच दशेक उलटून गेली तरी भाकरीचा चंद्र शोधण्यातच आज दोन पिढ्या बरबाद झालेल्या दिसत आहेत. नौकऱ्यासाठी संघर्ष? धंदा-व्यावसायासाठी संघर्ष? आहे ते टिकवण्यासाठी संघर्ष? ताट मानाने जगण्यासाठी संघर्ष? या सर्व संघर्षाच्या बळावरच आता हा भाग एका नविन संघर्षाच्या तयारीत आहे. तो म्हणजे राजकीय संघर्ष. हो भोसरी विधानसभेच्या आखाड्यात मराठवाड्याचे नेतृत्व रुजवण्यासाठी आता दोन संघर्ष रत्न निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. एक म्हणजे महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व दुसरे मराठी एकीकरण व विकास आघाडीच्या प्रदेशा अध्यक्ष छायाताई सोळंके-जगदाळे.
पवार यांनी माघील वेळी भोसरीतून ऐन वेळी निवडणुक लढवली होती. पण पुरेसा वेळ व तयारी अभावी पराभव स्विकारावा लागला तर शिरुर लोकसभेतून सोळंके-जगदाळे यांनी निवडणुक लढवुन शिवसेनेचे मातब्बार नेते आढळराव-पाटील व लोकप्रिय कलाकार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात घेतलेली हजारो मते या मुळे मराठवाड्याची अस्मिता जागी होऊन भोसरीच्या रिंगणात एकनाथ पवार व छाया सोळंके-जगदाळे यांच्या पाठीमागे सर्व ताकदीनिधी उभे राहण्याची साद घातली जात आहे. आता एकच निर्धार मराठवाडा सोलापुरचा आमदार अशा घोषणाही भोसरी मतदारसंघातून दणानु लागल्या आहेत
पावणे दोन लाखावर मतदार
भोसरी विधानसभेमध्ये तळवडे, रुपीनगर, अजिंठानगर, निगडी, जाधववाडी, ओटास्किम, घरकुल योजना, नेहरुनगर, दिघी, धावडेवस्ती, बालाजीनगर, शांतीनगर, भोसरी, धावडेवस्ती, सद्गुरुनगर अशा अनेक भागात मराठवाडा व सोलापुरमधील मतदारांची दाट लोकवस्ती आहे. तर मतदरांचा विचार केल्यास पन्नास टक्के मते ही याच भागातून जमा होतात. त्यामुळे मराठवाड्याच्या प्रत्येक नागरीकांनी आपल्यावरती होत असलेल्या अन्यायाला तोंड फोडल्यास २०१९ ला मराठवाड्याचाच आमदार असणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात कितीही असूदया भाऊ, काका आणि दादा आता मराठवाडा-सोलापुरचाच होणार आमदार हा आमचा आहे वादा. असा सुर सध्या भोसरी विधानसभेतून कानी पडत आहे.















