न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी राजस्थानचे आयआरएस अधिकारी अमरसिंह नेहरा यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
विधानसभा निवडणुकीकरिता निरीक्षकांची नियुक्ती केली जाते. पिंपरी आणि भोसरी या दोन्ही मतदारसंघाचे खर्च निरीक्षक म्हणून अमरसिंह नेहरा यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पिंपरी आणि भोसरी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाला भेट दिली. एक खिडकी, आचारसंहिता कक्ष, फ्लाईस स्कॉड, एसएसटी, व्हीव्हीटी, ईव्हीएम व्यवस्थापनाची माहिती घेतली.
निवडणूक आचारसंहिता कालावधीत कुठे अवैधरित्या मद्य , वस्तू, पैसे वाटप होत असल्याचे आढळल्यास ९४०४५४१२३९ नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, [emailprotected] या ई-मेलवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.











