न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- आरोपी शेख हा फिर्यादी यांच्याकडे कामाला आहे. आरोपीला नांदेड येथील पांडुरंग नागरे यांना माल पोहचविण्यास सांगितला होता. त्या मालाचे नागरे यांनी दिलेले ६४ हजार, मनमाड येथील महावीर ललवानी, एकनाथ बोडके यांच्याकडून प्रत्येकी ४५ हजार ५०० रूपये असे एकूण २ लाख ९ हजार ५२७ रूपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरून माळी यांची फसवणूक केली.
फारूक मोहम्मद शेख (रा. कल्याण) असे गुन्हा दाखल झालेल्या नोकराचे नाव आहे. याप्रकरणी मना सतिश माळी (वय ४०, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.