- मातंग समाज प्रमुखांच्या बैठकीत एकमताने निर्णय
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०१९) :- पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एकमुखी निर्णय घेण्यासाठी मातंग समाजाच्या फुले, शाहु, डॉ बाबासाहेब आंबेडकर व आण्णा भाऊंच्या विचाराने काम करणाऱ्या विविध संघटना प्रमुखांची तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊसाठे जयंती महोत्सव व मातंग समाजातील जेष्ठ नेत्यांची नुकतीच निगडीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पार पडली.
पिंपरी विधानसभेसाठी राष्ट्रवादी इच्छुक उमेदवार संदिपान झोंबाडे, कॉग्रेस आयचे मनोज कांबळे, शिवसेना बंडखोर युवराज दाखले, भाजपाकडुन अमित गोरखे, भाऊसाहेब आडागळे या नावांवर चर्चा करण्यात आली. जो राजकिय पक्ष मातंग समाजाला पिंपरी विधानसभेची उमेदवारी देईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
कदाचित मातंग समाजाला सर्वच राजकिय पक्षांंनी डावलल्यास सकल मातंग समाजाची ताकद दाखविण्यासाठी समाजाचा अपक्ष उमेदवार वरीलपैकी कोणीही असेल, असे पिंपरी-चिंचवड शहरातील सकल मातंग समाजाला व अखंड बाराबलुतेदार समाजबांधवांना तसेच पुरोगामी विचारसरणीतील समाज बांधवांना व संघटनाना आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सतीश भवाळ, सचिव संजय ससाने, मनोज कांबळे, सुरेश जोगदंड, संदिपान झोंबाडे, विठ्ठल कळसे, विशाल कसबे, युवराज दाखले, दत्ता थोरात, कैलास पाटोळे, मोहन वाघमारे, भास्कर नेटके, मा. नगरसेवक राम पाञे, भगवान वैरागकर, नारायण गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.











