न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०१९) :- मागील पाच वर्षातील केलेला विकासकामांची व कार्याची नोंद पक्षनेतृत्वाने घेतली व माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचासह सर्व सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आभारी आहे.
आगामी काळात शहरातील जे प्रश्न मागील पाच वर्षात प्रलंबित राहिले, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी व्हिजन तयार केले आहे. त्यामध्ये एमआयडीसीच्या जागेवर असलेल्या सर्व झोपडपट्टयांचे पूर्नवसन करणे, डेअरी फार्म येथे उड्डाणपूल उभारणे, पिंपरी कॅम्पातील वाहतुकीचा प्रश्न निकाली काढणे, प्राधिकरणातील एलआयजीमधील नागरिकांनी केलेल्या वाढीव बांधकामांना नियमितीकरण करणे आणि दापोडी परिसराला स्मार्ट सिटीत घेण्यासाठी प्रयत्न करणे हा आपला अजेंडा राहणार आहे, असे आ. चाबुकस्वार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.











