न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०१९) :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यातच घातपात टाळण्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असतानाच मनोर पोलिसांनी आज पालघरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पालघरच्या मनोर भागात ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये तीन एके ४७ रायफल्स आणि ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पालघरच्या मनोर परिसरात शस्त्र साठा आणि ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मनोर पोलिसांनी ही कारवाई केली असून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी व्यक्त केली आहे. पालघरमध्ये शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.












