न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये चिंचवड मतदारसंघातून आ. लक्ष्मण जगताप व भोसरीतून आ. महेश लांडगे या विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
तसेच पुण्यातल्या कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, साताऱ्यातून शिवेंद्रराजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली आहे.
भाजपाच्या या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये १२ महिला आमदारांचा समावेश आहे. १२ मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.












