न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड-भोसरी मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांनी आज सोमवार (दि. ३०) रोजी उमेदवारी अर्ज नेले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी चार अर्ज, शिवसेनेचे राहुल कलाटे यांनीही चार अर्ज , राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर प्रशांत शितोळे यांनीही प्रत्येकी चार अर्जांसह १५ जणांनी ३९ अर्ज नेले आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या तीन, भाजपचे तीन, शिवसेनेच्या सचिन भोसले एकाने अर्ज नेला असून एकूण ३३ जणांनी ९० अर्ज नेले आहेत. यात नगरसेविका सुलक्षणा धर, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ, भाजपच्या राजेश पिल्ले, अमित गोरखे, भीमा बोबडे, तेजस्विनी कदम यांनी देखील उमेदवारी अर्ज नेला आहे. गोरखे यांनी अपक्ष देखील उमेदवारी अर्ज नेला आहे. काँग्रेसच्या सुंदर कांबळे, जितेंद्र ननावरे यांनी अपक्ष अर्ज नेला आहे. एकूण ३३ जणांनी ९० अर्ज नेले आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून तीन उमेदवारी अर्ज नेले आहेत. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीकडून चार अर्ज नेले आहेत. भारतीय युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, नगरसेवक रवी लांडगे यांनी देखील अपक्ष अर्ज नेला आहे. त्यांच्यासह शांताराम भालेकर यांनीही राष्ट्रवादीकडून अर्ज नेले आहेत. त्यांच्यासह एकूण १३ जणांनी ३८ अर्ज नेले आहेत.












