न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात आमचं पण ठरलंय, कसबा विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नको, अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले असतानाही पक्ष नेतृत्वाने याकडे नजरंदाज करीत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी करीत आहेत. मात्र, त्यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
याआधीच कार्यकर्त्यांनी फलकबाजी करीत कोथरूड भागात दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे. आम्ही कोथरूडकर, अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नेतृत्व चंद्रकांत पाटील यांचे काम करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.















