न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- पिंपळे गुरव येथील मिलिटरी ग्राउंडजवळील रोडवर एक तरुण संशयितरित्या थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांनी परिसरात सापळा रचून आश्विन याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. आश्विन आनंदराव चव्हाण (वय १९, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.