न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघातील दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाकरीता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, आपण मोठ्या ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे बाळासाहेब गायकवाड यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.












