न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले महायुतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. आरपीआयने मागितलेल्या दोन जागाही महायूती सोडायला तयार नसल्याने आठवले नाराज आहेत.
उमरखेड मतदारसंघात महेंद्र मानकर आणि केज मतदारसंघात पप्पू कागदे यांच्यासाठी मागितली होती उमेदवारी, मात्र मुख्यमंत्री या जागा सोडण्यास अनुकूल नाहीत. यामुळेच आरआयपीचे राष्ट्रीय अध्य रामदास आठवले महायुतीवर नाराज आहे.
सोमवारी मुख्यमंत्री आणि आठवले यांच्यात वर्षावर चर्चा पार पडली. उमरखेड मतदारसंघात महेंद्र मानकर आणि केज मतदारसंघात पप्पू कागदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र मुख्यमंत्री या जागा सोडण्यास अनुकूल नसल्यामुळे आठवले नाराज आहेत. आरपीआयला जनाधार नसलेल्या जागी लढण्याचा भाजपाचा आग्रह आहे.












