न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
आमदार लक्ष्मण जगताप हे गुरूवारी (दि. ३) रोजी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हा अर्ज सादर करणार आहेत.
तत्पूर्वी भाजपकडून संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात रॅली काढण्यात येणार आहे. पिंपळे गुरव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात सकाळी ९ वाजता दर्शन घेऊन या रॅलीला सुरूवात केली जाणार आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.












