न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता आमदार महेश लांडगे येत्या शुक्रवारी (दि. ४) रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हा उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी मिळाल्यानंतर महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
भोसरी येथील महेश लांडगे यांच्या निवासस्थाना समोरील भाजी मंडई येथून सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्ता, भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणाहून निवडणूक विभाग कार्यालयापर्यंत भव्य रॅली व पदयात्रा काढून महेश लांडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.












