न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०१९) :- महायुती झाल्याने सेना -भाजपचे आमदार चाबुकस्वार व जगताप यांनी भेट घेत एकमेकांचे अभिनंदन केले. महायुती झाल्याने व चिंचवड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी लक्ष्मण जगताप यांना मिळाल्यानंतर नुकतेच दोन्ही आमदार एकत्र आले व त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे विलास मडेगिरी, अमोल थोरात, तर शिवसेनेचे विभाग प्रमुख अनिल पारचा, नितीन घोलप, किशोर केसवानी, जितू मंगतानी आदी उपस्थित होते.
“पिंपरीतून १ लाखाचा लीड आपण आणू” असे जगताप यांनी यावेळी म्हटले. यानंतर दोन्ही आमदारांनी व्यूहरचना आखत महायुतीचे तीनही आपले उमेदवार प्रचंड मताधिक्याने कसे निवडून येतील यावर चर्चा केली.















