न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीने आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील अनेक इच्छुक नाराज झाले आहेत.
यातच अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी भाजपमधून बंडखोरी करीत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणात उडी घेतली आहे. महायुतीने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या गुरुवार (दि. ३) रोजी सकाळी दहा वाजता अमित गोरखे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता खंडोबा मंदिर, आकुर्डी येथे कार्यकर्त्यांसमवेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सर्व कार्यकर्ते मित्र मंडळ यांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन अमित गोरखे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.















