न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादीकडून अनपेक्षितरित्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. राष्ट्रवादीने आज गुरुवार (दि. ३) रोजी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत सुलक्षणा धर यांच्या नावाचा समावेश आहे.
या मतदारसंघातून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, माजी आमदार अण्णा बनसोडे हे प्रबळ इच्छुक होते. मात्र यात नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत यांनी बाजी मारली आहे.
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार :- जळगाव शहर- अभिषेक पाटील, बाळापूर – संग्राम गुलाबराव गावंडे, कारंजा – प्रकाश डहाके, मेळघाट – केवळराम काळे, अहेरी – धर्मराजबाबा आत्राम
दिग्रस – मो. तारीक मो. शमी, गंगाखेड – मधूसुदन केंद्रे, कन्नड – संतोष कोळगे, नांदगाव – पंकज भुजबळ, बागलाण – दीपिका चव्हाण, देवळाली – सरोज अहिरे, कर्जत – सुरेश लाड, खेड आळंदी – दिलीप मोहिते, मावळ – सुनील शेळके, पिंपरी – सुलक्षणा शिलावंत, आष्टी – बाळासाहेब आजबे, माढा – बबनदाद शिंदे, मोहोळ – यशवंत माने, माळशिरस – उत्तमराव जानकर, चंडगड – राजेश नरसिंग पाटील















