- उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज करणार दाखल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे गटनेते व विद्यमान नगरसेवक राहुल कलाटे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. ते उद्या शुक्रवारी (दि. ४) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत भव्य रॅलीचे आयोजन करणार आहेत. यावेळी त्यांनी आपले मित्र मंडळ,कार्यकर्ते, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.











