न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे व राष्ट्रवादीचे प्रशांत शितोळे या दोघांनी आज शुक्रवारी आप-आपला अपक्ष उमेदवारी अर्ज प्राधिकरणातील निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे दाखल केला आहे.
महायुती असतांना काल विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असताना उमेदवारी न मिळाल्याने राहुल कलाटे यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे.
चिंचवडमधूनच काल भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनीही आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे.











