न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तर रायफल-शूटिंग स्पर्धेत चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय आणि श्रीमती के.जे.गुप्त ज्युनिअर कॉलेजच्या एकूण १० खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
यशस्वी खेळाडू – १९ वर्षे मुले :- अजय पाटील – प्रथम , प्रतिक माने – द्वितीय , ऋषी शर्मा – तृतीय ; १७ वर्षे मुले – प्रणव उकिर्डे – द्वितीय , कार्तिक पवार-तृतीय; १९ वर्षे मुली – साक्षी पवार – प्रथम , स्नेहा मुळे – तृतीय ; १७ वर्षे मुली – पूनम जाधव – प्रथम , श्रद्धा नाईकरे – द्वितीय ; १४ वर्षे मुली – प्रीती निमसे – प्रथम. तसेच शालेय जिल्हास्तर धनुर्विद्या स्पर्धेत विद्यालयातील कु. स्वरांजली शिंदे ( १९ वर्षे मुली ) हिने रिकर्व्ह राऊंड प्रकारात प्रथम, तर कु. निर्मिती शेलार ( १४ वर्षे मुली ) हिने इंडियन राऊंड प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला असून य सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
खेळाडू-विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले. उपाध्यक्ष श्री. जगदीश जाधव यांनी मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. संचालक श्री. विजय जाधव, मुख्याध्यापक श्री. बाळाराम पाटील, सौ. प्रतिभा देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. किसन आहिरे यांनी या सर्व यशस्वी खेळाडूंना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. या सर्व यशस्वी खेळाडूंना पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय भालेराव आणि क्रीडाशिक्षक श्री. शब्बीर मोमीन यांचे मार्गदर्शन लाभले.