न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ ऑक्टोबर २०१९) :- पिंपळे गुरव येथील बाबुराव गोपाळ जमाले (वय-८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुन, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. पञकार प्रकाश जमाले व अशोक जमाले यांचे ते वडील होत.
जलसंपदा खात्यात नव्याने ओ.एस.डी. या पदाची निर्मिती झाल्यानंतर त्या काळातील त्या पदावर नेमणूक झालेले ते पहिले अधिकारी होत. १९६० साली ते सांगवी परिसरात जलसंपदा खात्यातील नोकरी निमित्त वास्तव्यास आले. स्वच्छ प्रतिमा व अनेकांना मदत करण्याचा स्वभाव यामुळे त्यांचा लोकसंग्रह दांडगा होता.


















