- भोसरी मतदारसंघातील व चिखलीतील नागरिक लाखोंच्या संख्येने रॅलीत सहभागी होणार
- युवा नेते पांडाभाऊ साने यांचा निर्धार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्या गुरुवारी (दि. १०) रोजी सायंकाळी ५.०० वाजता भोसरी मतदारसंघात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीची सुरुवात भोसरीतील पीएमटी चौकातून होणार आहे. त्यानंतर ही रॅली भोसरीतील दिघी रोड, सिद्धेश्वर हायस्कुल, आळंदी रोड, या मार्गे कै अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे रॅलीची समाप्ती होणार आहे. या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
या रॅलीत महायुतीचे दिग्गज नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भोसरी मतदारसंघातील व चिखली परिसरातील नागरिक लाखोंच्या संख्येने या या रॅलीत सहभागी होऊन, आ. महेशदादा लांडगे यांना समर्थन देणार आहेत, असा विश्वास युवा नेते व पांडाभाऊ साने युवा मंचचे अध्यक्ष पांडा साने यांनी व्यक्त केला आहे.















