-
महेशदादांच्या आवाहनास युवा नेते पांडाभाऊ साने यांचा प्रतिसाद!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. महेशदादा लांडगे यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता शांत व सरळमार्गी प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.
‘मी महेश किसन लांडगे… माझ्या सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना आवाहन करतो की, विरोधकांकडे निवडणूकीचे कोणतेही मुद्दे नसल्या कारणाने ते वेगळ्या मार्गावर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका, कोणत्याही ठिकाणी वादा-वादी करू नका. छोटासा केलेला वाद काही लोकं मोठा करून त्याच भांडवल करू इच्छित आहेत, अशा लोकांपासून आपण लांब राहावे, आपला विजय हा सुनिश्चित आहे. २१ तारखेपर्यंत नेटाने व मोठ्या जोमाने आपले काम असेच सुरू ठेवावे’, ही विनंती, असे आवाहन लांडगे यांनीकार्यकर्त्यांना केले आहे.
याबाबत महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक व चिखली परिसरातील युवा नेते पांडाभाऊ साने यांनी ‘मी दादांच्या शब्दाबाहेर नाही, दादा म्हणतेंन तसं’ असा पवित्र घेत, आ. महेश लांडगे यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. तसेच विरोधकांच्या टीकेला न जुमानता महेशदादांच्या लाखाच्या मताधिक्यात वाढ कशी होईल, यासाठी मी दिवसरात्र एक करीन व करीत आहे. प्रसंगी विरोधकांना गांधीमार्गाने उत्तर देऊन, विरोधकांच्या टीकेतील हवाच संपवू, असा आशावादही साने यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना व्यक्त केला.















