न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उद्या दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मनपाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त कै.अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते सकाळी १० वा. पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार हे उपस्थित रहाणार आहेत. तसेच रक्तदान शिबीर, नेत्रदान फॉर्म स्वीकृती शिबीर आणि रस्सीखेच व संगीत खुर्ची यांचे आयोजन करण्यात आले आहे.


















