न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी चिंचवड विधानसभेचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.
सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरातील एका हॉटेलमध्ये राज्यातील वंचित बहुजन आघाडी च्या नेत्यांची गुप्त बैठक झाली होती. शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी प्रकाश आंबेडकर यांची वैयक्तिक भेट घेतली होती. त्यांच्यात पाठिंब्या विषयी सकारात्मक चर्चा झाली होती.
याबाबत आज आंबडेकर यांनी राहुल कलाटे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


















