न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५) :- मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल अण्णा शेळके यांचा तालुक्यात जोरदार प्रचार सुरु असून त्यांना मतदारांचा ही तितकाच जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी त्यांच्या नूर काही औरच होता. सुनिल अण्णांच्या स्वागतासाठी जशी मोठी मंडळी सामील झाली होती, तसेच लहान-लहान मुलेदेखील उत्स्फूर्तपणे आपल्या चिमण्या स्वरात अण्णांचे स्वागत करायला धावली. या आपलेपणाच्या स्वागताने अण्णाही भारावून गेले होते. ‘निवडणूक’, ‘राजकारण’, ‘मतदान’ या शब्दांचे अर्थही न कळणाऱ्या या चिमुकल्यांना सुनील अण्णांमधील विनम्र अन साधा माणूस भावला आणि ‘या हृदयाचे त्या हृदयी’ व्हायला वेळ नाही लागला !
सोमवारी गवळीवाडा, इंदिरानगर, तुंगार्ली, पांगळोली, वलवण, आगवाली चाळ, एसटी स्टॅन्ड, खंडाळा, खंडाळा गावठाण, जुना खंडाळा, रायवूड, ठोंबरेवाडी आदी गावांमधून सुनिल शेळकेंचा प्रचार दौरा पार पडला. यावेळी गावागावातून मिरवणूक काढून, फटाक्यांची आतषबाजी करून सुनिल अण्णांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. यात थोरामोठ्यांसह बच्चा कंपनीही जोरजोरात अण्णांच्या विजयासाठी घोषणा देत होती.
माता-भगिनींनी अण्णांना मनापासून आशीर्वाद दिले. सुनील अण्णांची वाट पाहत बसलेल्या एका अपंग बांधवांबरोबर जमिनीवर बसून त्याच्या शुभेच्छा स्वीकारताना अण्णा भारावून गेले होते. यावेळी काही चिमुकल्यांना उचलून घेऊन अण्णांनीही त्यांचे लाड केले आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. उद्योजक, फर्डा वक्ता, करारी आणि बेधडक नेता असलेलय सुनील शेळकेंच्या आतला कुटुंबवत्सल माणूसही यानिमित्ताने मावळवासीयांना पाहायला मिळाला. काही वेळेपुरते का होईना, रोजच्या दौऱ्याची धावपळ आणि श्रम विसरून या निरागस चिमण्यांमध्ये सुनील अण्णा रमले !











