पंतप्रधान मोदींच्या सभेची खबरदारी म्हणून पोलिसांकडून कारवाई …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०१९) :- सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गुरुवारी सायंकाळी एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार आहे. त्या अनुषंगाने घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिंग रोड बधितांच्या प्रश्नी लक्ष पुरवावे याकामी निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.
सनदशीर मार्गाने पंतप्रधान यांना याबाबतचे निवेदन सभेच्या ठिकाणी देण्यात येणार होते व पंतप्रधानांनी याबाबत लक्ष घालावे अशी समिती मागणी करणार होती. मात्र या निवेदनाची दखल घेत समितीचे विजय पाटील यांना पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभाग सतर्क होऊन आज गुरुवारी (दि. १७) रोजी सकाळी चिंचवड पोलिसांनी राहत्या घरातून त्याब्यात घेतले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांचे आदेशानुसार विजय पाटील यांना चिंचवड पोलीस ठाणे येथे स्थानबद्ध केले आहे. त्यांचे सोबत घर बचाव चे कार्यकर्ते ही आहेत.















