- युवा नेते पांडाभाऊ साने यांचे आवाहन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवारी (दि. १८) रोजी सायंकाळी ६.०० वाजता भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहा शेजारील गावजत्रा मैदानावर ‘विजयी संकल्प सभे’ चे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपा-शिवसेना-मित्रपक्ष महायुती चे भोसरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय-दमदार-आमदार ज्यांना आपण गेली पाच वर्षे खंबिर पाठिंबा दिला. त्यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी व पुन्हा आपली सेवा करण्याची संधी देण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक घटकासाठी विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा चिखलीतील प्रभाग १ मधील व भोसरी मतदारसंघातील सर्व नागरिकांनी आमदार महेशदादा लांडगे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी या सभेला उपस्थित राहून समर्थन द्यावे, असे आवाहन युवा नेते पांडाभाऊ साने यांनी केले आहे.












