- मतदारसंघातील नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चांना उधान!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०१९) :- विनापरवाना पदयात्रा काढल्याप्रकरणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे यांच्यावर पिंपरी ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस हवादलादर राजु शिवाजी पांढरे (वय ४६) यांनी पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. १७) लिंक रोड ते रमाबाईनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेसाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
महाराष्ट्र पोलीस अधिनियमन १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे बनसोडे आणि साबळे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नियम मोडणाऱ्या माजी आमदाराला मतदार पुन्हा आमदार करणार? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.












