न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०१९) :- कधी रिमझिम तर कधी जोरात पडणारा पाऊस.. सोबतीला ‘राष्ट्रवादी पुन्हा’ चे चैतन्यदायी गीत..ठिकठिकाणी स्वागतासाठी थांबलेले नागरिक… जलवृष्टीबरोबरच होणारी पुष्पवृष्टी.. औक्षणासाठी थांबलेल्या महिला-भगिनी..या उल्हसित वातावरणात सळसळत्या तरुणाईची निघालेली उर्जावान रॅली… !
तळेगाव शहर परिसरात शनिवारी सकाळपासूनच निसर्गातील आल्हाददायक बदलांना सोबत घेऊन निघालेली ही राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. भरपावसातही सुरु राहिलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या या उत्साही रॅलीला नागरिकांनीही तुफान प्रतिसाद दिला.
या रॅलीत तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठ महिलांनी औक्षण करीत, सुनिल अण्णांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांना मनापासून विजयासाठी आशीर्वाद दिला. या अनोख्या स्वागताने आण्णा भारावून गेले.















