न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०१९) :- महिनाभर निवडणुकीचा प्रचारसभा सुरु होत्या. या प्रचार सभांमध्ये भांडणे वादविवाद होतात. मात्र आज ऐन मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांना उमेदवारांना मारहाण करून दहशत माजविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवाला मारहाणीचे गालबोट लागले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी उपमहापौर डब्बू आसवानी व इतर कार्यकर्त्यांना धारधार शस्राने जबर मारहाण करण्यात आली आहे. युतीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आसवाणी यांनी केला आहे.
ही घटना सोमवारी (दि. २१ ) पिंपरी येथे घडली. यामुळे पिंपरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत















