न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी मतदारसंघात अनुचित घटना घडली आहे. अब्दुल रहीम नूरमहम्मद शेख (वय ६० वर्षे) हे भोसरीतील शांतीनगर वसाहतीतील जेष्ठ नागरिक मतदानासाठी भोसरीतील महात्मा फुले शाळा येथे मतदानासाठी गेले होते.
मात्र, रांगेत असतानाचा चक्कर येवून ते खाली कोसळले. ही घटना आज (सोमवारी) दुपारी मतदान केंद्रावर घडली. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.















