न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे जिल्हा क्रिडा परिषद यांच्या वतीने अयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलीच्या गटात एस बी पाटील कॉलेज ची सुरभी शर्मा द्वितीय तसेच किक बॉक्सिंगमध्ये प्रणिति मुळे प्रथम, कुस्तीमध्ये युवराज नढे, ऋषिकेश राठोड, सुमित काटकर, गोळा फेकमध्ये रोहन कलाने द्वितीय, कराटेमध्ये रोहित कुमावत प्रथम, अंजली बोरटे प्रथम तसेच मैदानी स्पर्धेत अभय बोडके,हर्षल शिंदे,अजित तलवार,यश पाटिल तृतीय,
स्पीड बॉल स्पर्धेत सिद्धि दांगट,श्रद्धा पाटील,दिप्ती लांगी,वैष्णवी तरस,खुशी भोंडवे,समृध्दी ढवळे प्रथम. विद्यार्थ्यानी विविध खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. विभागीय क्रिडा स्पर्धेसाठी विद्यार्थीथ्याची निवड झाल्याबद्द्ल संस्थेचे अध्यक्ष मा श्री ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पदमाताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, भाईजान काझी, सी .ई .ओ गिरीष देसाई, तसेच प्राचार्य संदीप पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या विद्यार्थ्यांना कॉलेजचे क्रिड़ा शिक्षक प्रदीप कासार सर यांनी प्रशिक्षण व मोलाचे मार्गदर्शन केले.