- मतदारसंघात झळकले निकालाआधीच आ. लांडगे यांचे अभिनंदनाचे फ्लेस्क
- ‘आमचे दादा लाखाचे लीड घेऊन विजयी होणार’
- कट्टर समर्थक पांडाभाऊ साने यांना विश्वास!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबाजीद्वारे ‘पर्मनंट आमदार महेशदादा लांडगे’ या आशयाचे फ्लेक्स लावून निकालाआधीच आ. लांडगे यांना भोसरीचे पुन्हा आमदार केले आहे.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे. चिखली, च-होली, मोशी परिसरात आमदार महेश लांडगे यांना शुभेच्छा देणारा फलक निकाला आधीच झळकला आहे.
युवा नेते व महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक पांडाभाऊ साने यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आमदार महेशदादा लांडगे यांनी मतदारसंघात व्हिजन २०-२० च्या माध्यमातून जोरदार विकासकामे केली आहेत. त्या बळावरच आमचे दादा लाखाचे लीड घेऊन विजयी होणार आहेत. फक्त आता निकालाची अधिकृत घोषणा बाकी आहे. ती उद्या होईलच.
निकाल काहीही असो परंतु, आ. लांडगे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र दुणावला आहे. हे यावरून स्पष्ट होते. भोसरी मतदारसंघातील लढतही आजी विरुद्ध माजी आमदार यांच्यात रंगणार आहे. हा निकाल आमदार लांडगे यांच्या बाजूने लागल्यास माजी आमदार विलास लांडे यांच्या राजकीय अस्तित्वास धोका पोहोचू शकतो