न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी:- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने उद्या मंगळवार (दि. १६. ऑक्टो) हा ”जागतिक अन्न दिवस” उत्साहात साजरा केला जाणार असून त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी स्नेह फाउंडेशनच्या वतीने आशा स्वयंसेविका, महिला आरोग्य समिती सदस्य व ए. एन. एम. यांचेकरिता पाककला स्पर्धचे आयोजन चाणक्य सभागृह, वाय. सी. एम. रुग्णालय, पिंपरी येथे करण्यात आलेले आहे.
या पाककला स्पर्धेमध्ये आशा स्वयंसेविका, महिला आरोग्य समिती सदस्य व ए. एन. एम. यांनी कमी खर्चिक, पोषक व आकर्षक पदार्थ तयार करून परीक्षकांकडे सादर करावयाचा असून सहभागी स्पर्धकांपैकी एकूण पाच विजेते निवडण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.