न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ नोव्हेंबर २०१९) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शहांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीमध्ये महाराष्ट्रात सुरू असलेल्या ओल्या दुष्काळाविषयी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
याचवेळी अमित शाह यांच्यासोबत राज्यातील सत्ता समीकरणाविषयी चर्चा झाली. यानुसार मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद देण्यास अमित शाह यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपती राजवट लागणार नाही असा भाजपला विश्वास असून ८ तारखेपूर्वी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.












