न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवडमध्ये चारचाकी वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. दुचाकी वरून आलेल्या तिघांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना लक्ष्य करत दगडाने काचांची तोडफोड केली. या घटनेत पाच ते सहा वाहनांचे नुकसान झाले आहे.
पिंपरी गावठाण येथील वाघेरे कॉलनीत अज्ञात टोळक्याने दगडाने वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना मध्यरात्री घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी आरडाओरडा करत रस्त्यावर दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करत दगडाने तोडफोड केली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाहन पार्क करायची का नाही असा सवाल नागरिक करत आहेत. या घटनेत ऐकून पाच ते सहा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.













