- नगरसेवक तुषार कामठे यांची आयुक्तांकडे मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हेंबर २०१९) :- पिंपळे सौदागर परिसरातील साई चौक, जगताप डेअरी येथे “स्पॉट १८” या बिल्डींगवर ” संजय भाऊ | AM SORRY ” असे लिहून मा. मुखमंत्री यांचा फोटो असलेला होर्डिंग लावलेला आहे. सदर घटना अत्यंत चुकीची असुन लोकशाहीमध्ये अशा प्रकारे एखाद्याची अवहेलना, चेष्टा, उपरोधिकता करणे चुकीचे आहे. तात्काळ या होर्डिंगवर कारवाई करून सदर होडिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्रादवारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, भा. ज. पा. व शिवसेना हे मित्रपक्ष असुन अशा प्रकारे होर्डिंग लावल्याने शांततेचा भंग होऊन वातावरण बिघडू शकते. राजकारण करताना आरोप – प्रत्यारोप करावेत पण व्यक्तिगत राजकारण करून एखाद्याची निंदा करू नये. सदरच्या होर्डिगमुळे असंतोष पसरून सामाजिक सलोखा राहणार नाही व राजकीय तेढ निर्माण होईल. सदरची घटना निंदनीय व निषेधार्थ असुन आपण तात्काळ या होडिंगवर कारवाई करून सदर होडिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, असे या पत्रात कामठे यांनी म्हटले आहे.
नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्राची प्रत, सहा. आयुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिं. चिं. म. न. पा., मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस स्टेशन आदींना पाठविली आहे.














