- महापौर पदाच्या कार्यकाळातील आजवरचा सर्वश्रेष्ठ अनुभव….. राहुल जाधव
- आणखी वाचा, राहुल जाधव यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०१९) :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २५ व्या महापौर पदी माझी निवड केली. या निमित्ताने ग्रामीण भागाला म्हणजेच जाधववाडी, चिखली या भागाला महापौर पद देऊन प्रतिनिधित्व दिले. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. शहरातल्या समस्यांबरोबरच ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्यावर माझा भर राहिला, असे महापौर राहुल जाधव यांनी महापौर पदाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण केल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त करताना सांगितले.
आपले अनुभव सांगताना राहुल जाधव म्हणाले की, (दि.०४ ऑगस्ट २०१८ ते २१ नोव्हेंबर २०१९) या माझ्या महापौरपदाच्या कालावधीतील महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावले. यात शहरांतील सर्व आरक्षित जागांची प्रथम माहिती घेऊन सोयी-सुविधांचे कामकाज विभागांच्या माध्यमांतून सुरु करणे, विकास कामांसाठी निधी उपलब्ध करणे. मनपाने प्रथमच नव्याने समाविष्ट गावांसाठी रस्ते विकास धोरण राबविले, या अंतर्गत सुमारे रु. ४२५ कोटी च्या ५० नवीन रस्ते बांधणीचे कामकाज, आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी शहरास पिण्याचा पाणीपुरवठा, देहू येथे रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण दिवा बत्ती व मोबाईल टॉयलेट व्हॅन पुरविणे. नागरवस्ती विभागाकडील विविध योजनांची माहिती शहरांतील दिव्यांग़, अनाथ महिलांपर्यंत पोहचविणे. क्रीडा हे आरोग्याचे दुसरे अंग असल्याने उद्यानांमध्ये ओपन जीम तयार करणे, म.न.पा. ने एकूण वार्षिक खर्चापैकी ५ टक्के खर्च क्रीडा क्षेत्रासाठी केला. यामधून सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांवर होणारा सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश, खेळाडूंच्या शारिरिक तंदुरुस्ती आणि आहाराबद्दल मार्गदर्शनपर कार्यक्रम राबविणे ही देखील आपली योजना असल्याचे महापौर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
महापौर चषक राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, ५० वी राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा, राज्यस्तर खो-खो स्पर्धा, ५९ वी राष्ट्रीय सौष्ठव (वरिष्ठ) स्पर्धा व नेमबाजी स्पर्धा शरीर, जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
पूर्व पीसीएमटी भागास आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीबद्दल बैठकीत सातत्याने आवाज उठविला असून दोन्ही शहरांना योग्य न्याय मिळण्यासाठी सतत प्रयत्नशील तसेच बडतर्फ केलेल्या सेवकांना एकवेळ संधी देणेबाबत आग्रही, ग्रामीण भागांतील विद्यार्थी, नोकरदारांसाठी विविध बस मार्ग सुरु करण्याचे निर्देश दिले. शहरांतील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील शास्तीकर १००० चौ. फुटापर्यंत माफ करण्याच्या निर्णयामुळे बऱ्याच नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने त्याचे समाधान मिळाले आहे.
महापालिकेच्या कामकाजाचा आणि शहराचा विस्तार वाढलेला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यांतील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधांचा लाभ घेता यावा तसेच कर, पाणीपट्टी भरणा करता यावा, महापालिका आणि नागरिक यांच्यामध्ये संवाद रहावा, यासाठी महापालिकेच्या पूर्वीच्या ६ प्रभाग संख्येत वाढ करुन ८ प्रभाग करण्यात आले आहेत, त्याचा नागरिकांना आणि महापालिकेच्या महसूल वाढीसाठी निश्चितच फायदा होणार असल्याची आपल्याला खात्री असल्याचे महापौर जाधव यांनी यावेळी प्रतिपादन केले.
पिंपरी-चिंचवड शहराला राज्यांत स्वच्छतेचा पहिला पुरस्कार मिळाला होता या स्वच्छतेच्या बाबतीत शहर मागे पडले, असा नाराजीचा आणि टीकेचा सुर नागरिकांकडून येऊ लागला. ही शहराच्या पर्यावरणाच्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने निश्चितच योग्य बाब नाही. शहर स्वच्छतेवर भर देण्यासाठी मोशी येथील कचरा डेपो समस्या, विद्युतविषयक कामकाज, रस्ते गटारी, नाले साफससफाईसाठी नवीन होणाऱ्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागामध्ये एका
संस्थेची नेमणूक करण्याची प्रशासनास सूचना देऊन त्याची अंमलबजावणी, एम्.आय्.डी.सी. भोसरी येथील अंतर्गत स्वच्छता व आरोग्याच्या तक्रारी सोडविणे, मा.मुख्यमंत्री यांनी आळंदी भेटीत दिलेल्या निर्देशानुसार शहरांतील पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर शासनाच्या मदतीने भर देण्यास सुरुवात केली आणि त्यानुसार पी.एम्.आर्.डी.ए.ला पत्र देऊन नद्या स्वच्छतेबाबत कळविले. इंद्रायणी नदी
पुर्नरजीवन प्रकल्प राबविण्याकरिता प्रदूषण नियंत्रणासाठी, नदी स्वच्छ, सुंदर आणि निर्मल बनविण्यासाठी ‘नमामि इंद्रायणी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला असून, त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आहे.
बऱ्याच ठिकाणी जलपर्णी काढण्यात यश आले असल्याचे तसेच केंद्रीय नगर विकास मंत्री ना.व्यंकय्या नायडू यांच्या पत्रानुसार शहरांत घनकचरा व्यवस्थापन योजना राबविण्याबाबत प्रशासनास निर्देश देण्यात आले असून त्यानुसार अंमलबजावणीही सुरु असल्याचे तसेच पर्यावरण संतुलन ही काळाची गरज असल्याने त्या दृष्टीने केवळ महापालिकेनेच दरवर्षी वृक्षारोपण न करता शहरांतील संस्था, नागरिक यांच्यामध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याने तसा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कामकाज. त्याचे शहराचे पुढील चित्र पुढील वर्षी पहावयास मिळेल, अशी आपल्याला आशा आहे, असे त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या मोहिमेचा, ई-वेस्ट कचऱ्याची विल्हेवाट लावणे इ.चा शुभारंभ पर्यावरण दिनी करण्यात आला. महापालिकेची शैक्षणिक व्यवस्था आणि विभाग अत्यंत कार्यक्षम तसेच लोकांमध्ये आदर असणारा असणे आवश्यक आहे, याबद्दल मी आग्रही आहे. तथापि प्रत्यक्षांत महापालिकेतील शिक्षण विभागाबद्दल वारंवार टीकात्मक बातम्या येऊ लागल्यामुळे त्याबद्दल बैठक घेऊन अधिकाऱ्यांची
मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शहरांतील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळणे आवश्यक आहे. तसेच शाळांसाठी चांगल्या लेखकांची पुस्तके, कवितासंग्रह खरेदी करुन ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासेतर संस्कार, गुणवत्तावाढ कार्यक्रम राबविणे, हे मला नवीन पिढीच्या दृष्टीने अतिशय आवश्यक कार्यक्रम वाटतात.
शैक्षणिक बाजूबरोबरच आरोग्य आणि वैद्यकीय सेवा हे महापालिकेच्या मूलभूत सुविधांचे प्रमुख अंग आहे, त्या दृष्टीने वाय.सी.एम. रुग्णालयातील रुग्ण, कर्मचारी, अधिकारी यांच्या अडी- अडचणींची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. कला, सांस्कृतिक विकास हे शहराच्या प्रतिष्ठेचे अंग आहे. त्यासाठी नागरिक आणि अधिकाऱ्यांची १ महिना आधी बैठक घेऊन नाविन्यता येण्यासाठी प्रयत्न आहे. या दोन्ही क्षेत्रांबरोबरच राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा तसेच विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळविलेल्यांचा सन्मान करुन प्रोत्साहन देण्यात येत आहे.
महापालिकेच्या १०५ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळांना भेटी देऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, सन्मा. नगरसदस्य यांचेसमवेत विविध अडीअडचणी समस्यांबाबत पाहणी दौरा. आषाढी वारी देहू आणि आळंदी देवस्थानच्या पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येऊन यशस्वी कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शहराचे भूषण असलेल्या दोन्ही पालख्यांतील दिंड्यांना पखवाज वाटप करण्यात आले. शहरातले विविध प्रश्न आणि पूर्वी विशेष लक्षपूर्वक कार्यवाही न झालेल्या अनेक प्रश्नांवर आयुक्तांसमवेत अथवा विभागीय बैठका घेण्यावर आपला भर असून अशा बऱ्याच बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश देऊन कामांना वेग व चालना येत असल्याचे महापौर म्हणाले.
भागवत धर्माच्या प्रसार आणि प्रचाराच्या उद्देशाने, तसेच वारकरी सांप्रदायाचे पारंपारिक शिक्षण लोकांना मिळावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ टाळगाव-चिखली येथे उभारण्याचा संकल्प केला आहे. श्री क्षेत्र देहू आणि आळंदीचा वारसा लाभलेले ठिकाण आणि महापालिकेची हद्द यामुळे चिखलीची निवड करण्यात आली. संतपीठाच्या उभारणीला १३ मे २०१५ रोजी झालेल्या महापालिकेच्या
सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली चिखली येथील सर्व्हे क्रमांक १६५३मधील एक हेक्टर ८० गुंठे जागाही महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या ठिकाणी वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्गाचा समावेश असेल. तसेच येथे सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, संतपीठामध्ये मराठी माध्यमातून शिक्षण असणार आहे.
महापौर चषक राष्ट्रीय शरिरसौष्टव स्पर्धा आयोजीत करण्यात आली. महापौर चषक राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा, महापौर चषक जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०१९-२०, महापौर चषक राज्यस्तर खो-खो स्पर्धा आयोजित करणएबाबत. महापौर चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा २०१८ आयोजित करणेबाबत. महापौर चषक राज्य स्तर कबड्डी स्पर्धा उद्घाटन, महापौर चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, चिखली दि.२०/१/२०१९ ते २४/१/२०१९,
महापालिकेच्या हद्दीतील मराठी शाळांचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करणेबाबत, चिखली येथील पाण्याची टाकी, राजे शिवाजीनगर प्रवेशद्वार, मैला शुध्दीकरण केंद्र भूमिपूजन, अग्निशामक केंद्राचे उद्घाटन, तळई गार्डन येथील ओपन जीमचे उद्घाटन, से.नं.१६ मधील विविध सोसायटीच्या नामफलकाचे उद्घाटन कार्यक्रम. मा.महेशदादा लांडगे, आमदार यांचे हस्ते भामा आसखेड योजना, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, २४*७ पाणीपुरवठा अमृत योजनेच्या अनुषंगाने
बैठक, केंद्र सरकारचा बेस्ट एक्सेसेबल वेबसाईड पुरस्कार पि.चि.म.न.पाला मिळाल्याबद्दल, दिल्ली, टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र, हॉलचे उद्घाटन, तानाजीनगर चिंचवड, महापालिकेच्या मिळकती, व्यायमशाळा, उद्याने, क्रीडांगणे, पाहणी दौरा. दि.७ ते १७/१/२०१९, बोपखेल येथील पाच एमएलडी क्षमतेच्या मलशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन कार्यक्रम नियोजन, दि.२/३/२०१९, आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पोर्टेबल अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याबाबत, प्रभाग क्र.२ कुदळवाडी, जाधववाडी, चिखली, मोशी या परिसरातील विविध चालू विकास कामे व नागरी समस्यांची महानगरपालिकेतील विविध विभागांच्या अधिका-यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन तसे निर्देश दिले, भेटीव्दारे पाहणी केली. तसेच विविध डी.पी. रस्त्यांच्या विकास कामांची पाहणी केली व आढावा घेतला.
प्रभागातील मैदाने, उद्यान, महिला व पुरुष व्यायामशाळा, तसेच प्रेक्षागृह इत्यादी नागरी सुविधांच्या आरक्षित जागांची पाहणी केली. तसेच संबंधित विभागाच्या अधिका-यांना आरक्षित जागा विकसित करण्याच्या सुचना देण्यात आल्या. महापौर निवासस्थानाच्या आरक्षित जागी महापौर निवासाचे बांधकाम सुरू करणेबाबत पत्रव्यवहार, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या नागरपूर येथील सभेस उपस्थिती, १९ वी महाराष्ट्र महापौर परिषद लोणावळा येथे संपन्न झाली. १६ महापौर परिषदेमध्ये सहभागी झाले होते. महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळण्यासाठी जे विविध ठराव करून शासनाला पाठविले त्याबाबत काहीच ठोस निर्णय न झाल्याने खंत व्यक्त केली. मोशी कचरा डेपोमध्ये नव्याने होणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पांतर्गत तयार होणाऱ्या १००० टन प्रतिदिन क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसेलिटी (MRF) च्या प्रकल्पाची व प्लॅस्टीक पासून इंधन निर्मितीची पहाणी केली.
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त दिंडी प्रमुखांना पखवाज वाटप करण्यात आले. यासाठी सन्माननीय नगरसेवकांच्या मानधनामधून व पदाधिकाऱ्यांच्या वर्गणीमधून आर्थिक निधी उभारण्यात आला. अखिल भारतीय महापौर परिषदची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आग्रा (उत्तर प्रदेश) येथे सहभाग. पिंपरी चिंचवड भागातील ई बसेस व सी.एन.जी.बसेस लोकार्पण सोहळा. व पिंपरी चिंचवड दर्शन बससेवा सुरु करण्यात आली. भिमसृष्टी प्रकल्पाचे उदघाटन व माता रमाई पुतळा उभारणेचे भुमिपूजन कार्यक्रम संपन्न तळवडे, त्रिवेणीनगर, येथील स्पाईन रस्त्याने बाधितांच्या पुनर्सनासाठी पिं.चिं.नवनगर विकास प्राधिकरणाकडून मंजूर झालेल्या पेठ क्र.११ मधील पर्यायी निवासी जागा क्र.१ व २ चे लेआऊट मधील जागा सोडत कार्यक्रम. स्मशानभूमि व दशक्रिया विधी घाट पाहणी दौरा मा.महापौर यांचा प्रभाग क्र. २ वॉर्ड पाहणी दौरा. प्रभाग क्र.२ मध्ये साई जीवन शाळेजवळ मैदान विकसित करणे, जाधववाडी मधील गट नं.५३९ विकसित करणे, जाधववाडी मधील गट नं.६०६ आरक्षण क्र.१/४४६ येथे माध्यमिक शाळा इमारत बांधणे, बो-हाडेवाडी येथील ताब्यात येणा-या गायरान जागेतील शाळा बांधणे, जाधववाडी, कुदळवाडी मधील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणे, डी. पी. व नॉन डी. पी. रस्ते विकसित करणे. महापालिकेच्या एकूण ८ क्षेत्रिय कार्यालयांना भेटी देऊन विविध अडीअडचणी, समस्या व त्यानुषंगाने प्रश्नांची सोडवणूक करणेकामी संबंधितांस सूचना देण्यात आल्या. महापालिकेच्या वतीने सण, सोहळ्यावर खर्च न करण्यासंबंधीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने गटनेत्यांची बैठक आयोजित करणेबाबत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वैद्यकीय निधीच्या माध्यमांतून दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या, अपघातग्रस्त अशा एकूण ४५५ गरजू रुग्णांना प्रत्येकी रु.५००० प्रमाणे रक्कम रु.२२,७५,०००/- चे अर्थसहाय्य. या सर्व कालावधीत सुमारे २६२९ नागरी, प्रशासकीय, खाजगी, उत्सव, सोहळे इत्यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत कार्यक्रमांना उपस्थिती. एकूण तीन परदेश अभ्यास दौरे येरेव्हान, आर्मेनिया येथे आयोजित महापौर परिषदेस उपस्थित दिनांक ०७ ते ०९ सप्टेंबर २०१८, बार्सिलोना, स्पेन दि.१३ ते १५ नोव्हेंबर २०१८, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथे आयोजित महापौर परिषदेस उपस्थित दिनांक ०७ ते १० जुलै २०१९ कोल्हापूर, सांगली भागात व पिंपरी चिंचवड शहरात पुरस्थिती निर्माण झालेने सर्वत्र भेटी व नागरिकांना जीवनावश्क वस्तूंचे वाटप करण्यात आले. एकूण १८ मा. महापालिका सभा पार पडल्या. त्यापैकी २७ वेळा मा. महापालिका सभा तहकूब झालेल्या आहेत.
यांतील कांही कामे महापालिकेच्या नित्य योजनांतील असली तरी महापालिकेच्या आणि पदाच्या माध्यमांतून शहराला ग्रामीणसह क्रमांक १ च्या अत्युच्च उंचीवर नेऊन ठेवण्याच्या आणि शासनाच्या धोरणांना यश देण्याच्या प्रयत्नांत केवळ एक वर्षाच्या काळांत बराच पल्ला गाठण्यात यश लाभल्याचे समाधान महापौर जाधव यांनी पत्रकार परिषदेचा समारोप करतांना व्यक्त केले.















