- प्रभाग दोन जाधववाडी, चिखलीत आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २, जाधववाडी, चिखली येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला.
महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अश्विनी जाधव, सारिका सस्ते (बो-हाडे), साधना मळेकर, स्विनल म्हेत्रे, माजी नगरसदस्य सुनिल लोखंडे, शांताराम भालेकर, माऊली जाधव, नामनिर्देशित फ प्रभाग सदस्य दिनेश यादव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नितीन देशमुख, दिलीप भोसले, उप अभियंता संजय माने, मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश भोसले, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते नितीन बो-हाडे, संतोष जाधव, आप्पा बालघरे, गणेश किवळे, शिवकुमार बायस, रवि जांभुळकर, भरत
नरवड, सुरेश सुर्यवंशी, अंकुश जाधव, जयंत बोडे, राजेश शेळके, शामराव आल्हाट, हनुमंत बोराडे, नामदेव याउल, किसन आल्हाट, जयवंत थोरात, तानाजी काळे, सदाशिव आल्हाट, योगेश बो-हाडे, वसंत बो-हाडे, सुधीर सस्ते, राजेंद्र सस्ते, प्रिती बोर्डे, रेखा चिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी साई जीवन शाळेजवळील मैदान विकसित करणे, जाधववाडी येथील माध्यमिक शाळेची इमारत बांधणे, बो-हाडेवाडी येथील गायरान जागेवर शाळा इमारत बांधणे, डीपी व नॉन डीपी रस्ते विकसित करणे, हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणे, तसेच सेक्टर १६ राजे शिवाजीनगर भागातील काँक्रीटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. तळई गार्डन परिसर विकास प्रकल्पाचे व चिखली गावातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. तसेच तळई गार्डन लगत सीएसआर मार्फत विकसित ई – टॉयलेट प्रकल्पाचे उदघाटनही या वेळी करण्यात आले.
बो-हाडेवाडी येथील शाळेचे जागेचे एकूण क्षेत्रफळ ४१०० चौरस मिटर असून ३६११ चौरस मिटर बांधकाम होणार असून या शाळेस ३ मजले असणार आहेत प्रत्येक मजल्यावर क्लास रुमसह स्त्री/पुरुषांसाठी टॉयलेटसह बाथरुम असणार आहेत. तसेच मोठा हॉल, सायन्स व कॉम्पुयुटर लॅब, तसेच प्रशस्त वाहन तळ असणार आहेत. या शाळेच्या बांधकामास सुमारे १२ कोटी ३८ लाख रुपये इतका खर्च येणार असून या परिसरातील विदयार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच जाधववाडी येथील गट नं.६०६ आरक्षण क्र.१/४४६ येथे माध्यमिक शाळेच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १५,२९२ चौरस मिटर असून ७६३८ चौरस मिटर इतके इमारतीचे बांधकाम होणार असून यात ४ मजल्यावर ३८ क्लास रुम सह मोठा हॉल, सायन्स व कॉम्पुयुटर लॅब, तसेच प्रशस्त वाहन तळ असणार आहेत. तसेच स्त्री/पुरुषांसाठी टॉयलेटसह बाथरुम असणार आहेत. या शाळेच्या बांधकामास सुमारे १२ कोटी ९३ लाख रुपये इतका खर्च येणार असून परिसरातील विदयार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.















