न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०१९) :- शहरातील नागरिकांच्या अपुरा, अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल तक्रारी लक्षात घेऊन व उपाययोजना करण्याऐवजी मा. आयुक्त आपले दिवसाआड पाणीपुरवठा धोरण म्हणजे, रोगापेक्षा ईलाज भयंकर असे आहे.
मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस, पवनाधरण क्षेत्रात मुबलक पाणी साठा, धरण क्षेत्रातून पिंपरी-चिंचवडचे मंजूर पाणी पुरवठ्यापेक्षा अतिरिक्त पाणी उचलून सुद्धा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनशून्य कारभारमुळे शहरात समान व पुरेशा दाबने पाणीपुरवठा होत नाही. माता – भगिनी, नागरिक, सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे तक्रार करत आहेत.
स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी ही मुलभूत नागरी सुविधा जर महापालिकेला देता येत नसेल तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना व आयुक्तांना शहरवासीय धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. पाणी कपात मागे न घेतल्यास शहरात तीव्र जनआंदोलन उभे राहील, असे शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे पाटील यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.















