न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०१९) :- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप व आदर्श माता श्रीमती उल्हासाबाई हनुमंत तापकीर यांच्या हस्ते बॅटमिंटन टेनिस स्पोर्ट, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी ग्राउंडचे फित कापून नुकतेच उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप यांनी टेनिस बॅट व क्रिकेट खेळून आनंद साजरा केला.
यावेळी काका’ स इंटरनॅशनल स्कुलचे ट्रस्टी ज्ञानेश्वर तापकीर, स्वीकृत नगरसदस्य विनोद तापकीर, नवीन तापकीर, निलेश तापकीर, प्रिंसिपोल बबिता नायर, चिराग फुलसुंदर, ब प्रभाग अध्यक्ष करुणा चिंचवडे, नगरसेवक अभिषेक बारणे, निता पाडाळे, सागर आंघोळकर, महेश जगताप, कैलास थोपटे, संदीप नखाते, विठ्ठल भोईर, संतोष बारणे, अमोल देवकर, सुरेश जाधव, विजय मुरकुटे,,ज्योति भारती, राणी कौर, आदि मान्यवर उपस्थित होते.
नर्सरी ते पाचवीपर्यंत शाळेच्या मुलांनी मलखांबचे प्रकार, तसेच कराटे, डान्स असे विविध कला कौशल्यप्रकार करून दाखवले, कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन नवीन तापकीर, निलेश तापकीर यांनी केले.
आभार ज्ञानेश्वर तापकीर यांनी मानले.