न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असणाऱ्या तरुणीवर अज्ञाताने अँसिड हल्ला केला. कु. आंचल कांबळे असे या तरुणीचे नाव आहे. ती बसथांब्यावर बसची वाट पाहत उभी होती. या निंदनिय घटनेचा शिवसेना व शिवशाही व्यापारी संघाच्या तसेच भारतीय लहुजी पँथरच्या वतीने जाहीर निषेध केला आहे.
हल्लेखोर हल्ला करुन पसार झाले. आरोपींना तात्काळ अटक करून मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी माजी तिरोडा- गोरेगाव विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


















