न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- प्रितिश जितेश कोकाटे, या संभाजीनगर, चिंचवड येथील कमलनयन बजाज शाळेतील विद्यार्थ्यांची नॅशनल बास्केट बॉल असोसिएशन, नोएडा, उत्तर प्रदेश येथे बास्केटबॉलचे पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली.
त्याबद्दल त्याचा उपमहापौर तुषार हिंगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, पर्यवेक्षक डी.एम.भिसे, अनिता केदारी, राजू कोतवाल, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड शारीरीक संघटनेचे कार्याध्यक्ष रफीक इनामदार, जितेश कोकाटे हे उपस्थित होते.
प्रितिश यांना देशातील तसेच परदेशातील बास्केट बॉल क्रिडा तज्ञांकडून नोएडा येथे उच्च प्रशिक्षण देण्यात येणार आहे.















