न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ ह ‘ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत (दि. २१) रोजी कारवाई करणेत आली. संत तुकाराम नगर (प्रभाग क्र. २०) भागातील ०६ वाढीव व नव्याने आर . सी . सी . , वीटबांधकाम , पत्राशेड इ . अनधिकृत बांधकामावर अंदाजे १६२८ . २१ चौ . फु . बांधकामावर कारवाई करणेत आली.
अशाप्रकारे प्रभाग क्र. २० मधील ०६ अनाधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली. ही कारवाई २ जेसीबी , १ डम्पर , १५ मजूर , आणि मनपाचे १० पोलीस कर्मचारी अधिकारी , पिपरी पोलीस स्टेशन ०३ पोलीस कर्मचारी अधिकारी याचे सहकार्याने केली.
सदर कारवाई ‘ ह ‘ प्रभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली व २ उपअभियंता, २ कनिष्ठ अभियंता यांचेसह ०५ बीट ऑफिसर, १० मनपा कर्मचारी यांचे पथकाने केली. अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका ( ह प्रभाग ) बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















